ब्रेन डेथ

नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे येथील श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे एकदिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण अंतर्गत अवयवदान जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ब्रेन डेथ

जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एन.एस.एस. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घनवट म्हणाले की, जनसामान्यापर्यंत जागृती व लोकसहभागासह पुढाकार व्हावा,यासाठी  सदैव प्रयत्नशिल असून यशवंत प्रतिष्ठानने ३५० नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केल्याचेही यावेळी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.नवनाथ आगळे म्हणाले की,समाजोपयोगी उपक्रम,जागृतीकरिता नेहमीच महाविद्यालय अग्रेसर राहीले आहे.

ब्रेन डेथ

   “अवयवदान जागृती कार्यशाळेत बोलतांना जिल्हा शासकिय रुग्णालयाचे नेत्रदान,अवयवदान जागृती तथा देहदान व्यवस्थापक सतिष आहिरे यांनी रक्तदान,नेत्रदान, अवयवदान,देह दान जनजागृतीवर अनुभवी मार्गदर्शन केले.अवयवदानबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसह,ऑडिओ -व्हिडिओसह,अद्ययावत सोप्या भाषेत मार्मिक प्रबोधन यावेळी त्यांनी केले.

ळे,हृदय,फुफुसे,लिव्हर,स्वादुपिंड,मूत्रपिंड, आतडे,त्वचा, इ अवयवदान दान करू शकता,कधी? केव्हा?कुठे?कसे?करावे,याबद्दल सर्वसामान्यांच्या मनातील भीती,अज्ञान,प्रश्न यावर बोध केला.ब्रेन डेथ (मेंदू मृत्यु) झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आहिरे यांनी केले. मृत्यु (डेथ डिक्लरेशन) प्रमाणपत्र घ्यावे.रुग्णांच्या नातेवाईकांनी नेत्रदानासाठी तत्काळ चार तासांच्या आत जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क करावा. अवयवदानासाठी ब्रेनडेथ घोषित झाल्यापासून तत्काळ मेडिकल कॉलेज,हॉस्पिटल वैद्यकीय टीमला कळवावे. मरणोत्तर देहनादांनासाठीही चार ते सहा तासांत हॉस्पिटलशी संपर्क करावा. तसेच अवयवदानाच्या खोट्या मेसेजेस खात्री झाल्याशिवाय,फॉरवर्ड करूच नये.

ब्रेन डेथ

अवयव तयार करता येत नाहीत.मृत्यूपूर्वी जिवंतपणी रक्तदान करा,मरणोत्तर नेत्रदान,व जाता जाता अवयवदान करा, देहदान करा.असे कळकळीचे आवाहन जनजागृती प्रसंगी केले.अधिक माहिती साठी.9226398194 संपर्क करावा. तसेच घरबसल्या ऑनलाईन अवयवदान संकल्प फॉर्म http://notto.abdm.gov.in या वेबसाईटवर भरू शकता. अशी माहिती दिली सर्व विद्यार्थ्यांनकडून श्री.आहिरे यांनी अवयदान प्रतिज्ञा वदवून घेतली. यानंतर अटलबिहारी वाजपेयी होमिओपॅथिक कॉलेज जळके ता.नेवासा येथिल डॉ.सारिका इंगळे यांनीही अवयवदानाचे प्रकार, व्याख्या, गैरसमज,अज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे कार्डशिट पोस्टर्स प्रदर्शन सह सविस्तर माहिती,गरज,मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी सर्वांना अवयवदान करण्याचे आवाहन केले.सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

ब्रेन डेथ

अवयवदान जागृती कार्यशाळा आयोजनसाठी.प्राचार्य.डॉ.संजय घनवट व एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.नवनाथ आगळे समन्वयक प्रा.गणेश गारुळे, सह समन्वयक डॉ.कार्तिकी नांगरे यांनी यांनी ऊत्तम नियोजन केले. सूत्रसंचालन डॉ. कार्तिकी नांगरे यांनी केले व प्रा.गणेश गारुळे, सर यांनी आभार मानले.  या कार्यक्रमासाठी प्रा डॉ जगदीश सोनवणे प्रा डॉ उमेश कांबळे प्रा डॉ एन डी शेख प्रा डॉ बी एल शिंदे प्रा डॉ दारकुंडे प्रा डॉ वाळुंज प्रा डॉ साळवे प्रा डॉ बर्डे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेन डेथ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ब्रेन डेथ
ब्रेन डेथ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ब्रेन डेथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!