
नेवासा – सोनईवरून नेवासा, खरवंडी, वडाळा, कांगोणीकडे जाण्यासाठी जवळचा सोपा मार्ग आहे. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सूचित केलेला आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. आता बऱ्याच वर्षानंतरच्या मागणीला यश आले पण या रस्त्याचे कसेतरी राखडत काम सुरू असलेल्या कामातील अनियमितता, निकृष्ट दर्जाचे तसेच अरुंद रस्त्याबाबत तक्रारी होऊ लागल्या आहेत. काम झाल्यानंतरही लगेचच हा रस्ता वाहतुकीमुळे खराब होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे हा रस्ता कसा टिकणार असा प्रश्न विचारला जात आहे. चालू.असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. काही महिन्यांपूर्वीपासून हे काम चालू आहे. या रस्त्याच्या बाजूला गटारी व साईडपट्ट्या न करता रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हिंगोणी-सोनई परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

