नेवासा : खंडेराय महाराजांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने काल शनिवारी (दि. ७) हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने म्हाळसा माहेर असलेले नेवासा बुद्रुक नगरी दुमदुमली होती.
भव्य यात्रा भरली होती. चंपाषष्ठी नेवासा बुद्रुक काल शनिवारी चंपाषष्ठी निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील खंडोबा म्हाळसा मंदिर प्रांगणात उत्सवाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा मंदिरात संभाजी ठाणगे यांच्या हस्ते उत्सव मूर्तीस अभिषेक खालण्यात आला. त्यानंतर युवकांनी जेजुरीहून पायी चालत आणलेल्या ज्योतीचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी हभप उद्धव महाराज मंडलिक, कोंडीराम महाराज पेचे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, महत सुनीलगिरी महाराज,महंत ऋषिनाथ महाराज, संभाजी ठाणगे, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, सरपंच प्रकाश सोनटक्के, माजी सरपंच दादासाहेब कोकणे, आण्णाभाऊ पेचे, बालू फसले, संजय कुटे, मंदिर पुजारी अमृत रहाट, प्रसाद रहाट यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तळी भंडारा कार्यक्रम पार पडला.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भंडारा,खोबऱ्याची उधळण केली. नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी, सच्चिदानंद बाबा, नारदमुनी मंदिरात देवस्थानचे अध्यक्ष डॉ. मुरलीध्रर कराळे व देवस्थानचे विश्वस्त एकनाथ रेड़, प्रभाकर बोरकर, बाळासाहेब जपे, गणपतं नळकांडे, रमेश काशीद, एकनाथ डोहळे, रावसाहेब पेचे, गोकुळ जायगुडे, सर्जेराव चव्हाण, अशोक काळे, रंजना भाकरे,अशोक मारकळी, केशव महाराज डौले, पुंजाराम पेचे यांच्या वतीने आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.
नव्या मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त सकाळी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने पारायण करण्यात आले. चंपाषष्ठी निमित्त येथे सप्ताहभर ज्ञानेश्वरी पारायण व रात्री नामवंत किर्तनकारांची कीर्तने भक्तिमय वातावरणात पार पडली. चंपाषष्ठी निमित्ताने येथील खंडोबा मंदिर प्रांगणात मोठी यात्रा भरली होती. विविध स्टॉलवरील वस्तू खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चंपाषष्ठीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना वांग्याच्या भरीतासह बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामुळे येथील वातावरण म्हाळसा खंडोबामय बनले होते. खंडोबा म्हाळसा नवीन मंदिरात त्याच बरोबर पुरातन मंदिरात दिवसभर वांग्याच्या भरीतासह भाकरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. पुरातन मंदिर प्रांगणात समर्पण फाऊंडेशनच्या वतीने जळगाव येथून आणलेल्या सात किंटल वांगे भरीताचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.