देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत केंद्र स्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच कैलास झगरे होते. विद्यार्थी यांच्या अंगी असणाऱ्या नृत्य, नाटय, वेशभूषा सादरीकरण, समूह गीत गायन, हस्ताक्षर स्पर्धा, गायन, लेखन यां कलांना उस्फूर्त वाव देणारा उपक्रम म्हणजे . विविध गुणदर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम जळके बुद्रुक येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच कैलास झगरे,उप सरपंच संजय बर्डे,केंद्र प्रमुक संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समिती बाळासाहेब थोरात ,उपअध्यक्ष ज्ञानेश्वर पागिरे,व सदस्य यांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने , स्वागत गीत इयत्ता ६ वी ७ वी च्या विद्यार्थि मुलींनी सादर केले व त्यानंतर मुख्याध्यापक संजय जाधव सर यांनी सुत्रसंचलन करून विविध गुणदर्शन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली मुलांसाठी मोबाईल चे दुष्परिणाम सांगणारी नाटीका शिक्षणाचे महत्त्व सांगणारी नाटीका तसेच विनोदी नाटीका , मुलामुलींनी अतिशय चागल्या प्रकारे सादर केल्या. केंद्र स्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धेत प्रवरा संगम केंद्रातील 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नि केंद्र स्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धा यात सहभाग घेतला यात विविध कार्यक्रमात प्रथम, दुतीय, तृतीय क्रमांक आलेल्या मुलाना प्रशस्तीपत्र व लेखन साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशभक्तीपर गीते मैत्रीपर गीते तसेच बालगीते व नृत्य प्रकारांचे सादरीकरण लहान मुलांनी केले तसेच विविध नेत्याचे वेशभूषा सादरीकरण, समूह गीत गायन, हस्ताक्षर स्पर्धा,दिवसभर सप्पन झाल्या. यावेळी कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य सविता ताई , सलीम शेख, संजय लोखंडे, ,पत्रकार इकबाल शेख,अशोक पुंड,माजी उपसरपंच नितीन दहातोंडे,,अशोक पंडित,,राजू राजगुरू, भारत नांगरे ,नंदकिशोर ससे, प्रशांत राजगुरू,देविदास राजगुरू ,हरून पटेल,शिवाजी गायकवाड ,
निखिल देवतरसे ,राजेंद्र ठोंबरे ,आदिनाथ भिसे ,शहादेव पवार ,राणी पंडित, संदीप झगरे,जालिंदर गोरे,बबन जराड ,सुनील वाघ,संजयकुमार लाड ,शशिकांत मोरे ,शिवाजी झगरे,,संतोष ढोले ,अनिल मुसळे ,सुनील नरसाळे बाजीराव राठोड ,मुरलीधर मेद्रान राजेंद्र साळवे ,संजय फाजगे ,चंद्रकांत पालवे ,श्रीमती हर्षा फसले ,श्रीमतीपद्मावती गायकवाड, श्रीमती वैशाली जंगले , श्रीमती मनीषा आवारे उपस्थित होते. आभार संतोष ढोले सर यांनी मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.