नेवासा – तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील देवगाव व जेऊर रस्ता परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या घटनेत दोन कुत्री व एक बोकड ठार केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवार दि. १४ रोजी रात्री भेंडा बुद्रुक येथील देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कुत्र्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला तर त्याच रात्री अभिजीत बबन मिसाळ यांच्या पाळीव कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला करून ठार मारले. दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१५ रोजी रात्री किरण भाऊसाहेब मिसाळ यांचा बोकड बिबट्याने फस्त केला. रविवारी भर दुपारी ४ वाजता भेंडा-जेऊर रस्त्यावर बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.