नेवासा – पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नीट पीजी २०२५ परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केली आहे. त्यानुसार नीट पीजी २०२५ परीक्षा १५ जून रोजी होणार आहे. संगणक आधारित होणारी ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेशी संबंधित तपशील आणि इतर माहिती योग्यवेळी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने घेतली जाते.

एमबीबीएस अभ्यासक्रमावर आधारित शरीरशास्त्र, शरीरविज्ञान, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, औषधशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषध, शस्त्रक्रिया, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, कान – नाक – घसा शास्त्र, नेत्ररोगशास्त्र, अस्थिव्यंगशास्त्र, मानसोपचार, रेडिओलॉजी, भूलशास्त्र, त्वचारोग आदी विषयांचा यामध्ये समावेश आहे. विविध वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांचे ज्ञान, समज आणि कौशल्यांचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रश्नांची निवड करण्यात येते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.