नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या ४२ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने युवा कथाकार ब कीर्तनकार लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या सुश्राव्य चाणीतून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची जीवन चरित्र कथा प्रारंभ झाली आहे.
या कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सद्गुरू किसनगिरी बाबांचे कार्य भक्तांच्या सुखासाठी व समाजासाच्या उद्धारासाठी होते, असे प्रतिपादन लक्ष्मण महाराज नांगरे यांनी यावेळी केले. देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली ही कथा देवगड देवस्थान येथे सुरू आहे.

यावेळी कथाकार ह.भ.प लक्ष्मण नांगरे महाराज म्हणाले की, समाजाला संस्काराने व सुविचाराने सधन करण्यासाठी सदगुरू किसनगिरी बाबा हे कण कण झिजले, वणवण फिरले त्यांनी कष्ट सोसले म्हणून आज पारमार्थिक सुखाचा आनंद आपल्याला देवगड देवस्थान येथे गुरुवर्य महंत भास्करगिरीजी व गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे.
यावेळी ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प देविदास महाराज मस्के बोलताना म्हणाले की देवगडचे बाबाजी व स्वामीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा कार्य चालू आहे मी एक सेवेकरी आहे सर्व कृपाशीर्वाद बाबांचा व स्वामीजींचा आहे असे ते बोलताना म्हणाले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.