ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
Shani Surya Yuti

Shani Surya Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्याची युती मीन राशीत 30 वर्षांनंतर होणार आहे. खरंतर शनी 29 मार्च रोजी संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Shani Surya Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Sun) सध्या मीन राशीत विराजमान आहे. तर, 29 मार्च रोजी शनीसुद्धा (Shani Dev) मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीन राशीत शनी-सूर्याची युती होणार आहे. कारण, 29 मार्च रोजी वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण देखील लागणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्याची युती मीन राशीत 30 वर्षांनंतर होणार आहे. खरंतर शनी 29 मार्च रोजी संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, सूर्य 14 एप्रिलपर्यंत मीन राशीत असणार आहे. यामुळे जवळपास 15 दिवसांपर्यंत सूर्य आणि शनीची युती होणार आहे. मात्र, हा काळ 5 राशींसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या 5 राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Shani Surya Yuti

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीची युती फार कष्टायची असणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला अनेक आजार उद्भवू शकतात. तसेच, मानसिक ताण जाणवेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सूर्य आणि शनीच्यामध्ये वैराचे नाते असल्यामुळे हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. शनीच्या राशी संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांवर ढैय्या सुरु होणार आहे. या कालवधीत तुम्हाला अनेक आजार उद्भवू शकतात. तसेच, वाईट सवयींपासून दूर राहणं गरजेचं आहे. 

Shani Surya Yuti

कन्या रास(Virgo Horoscope)

सूर्य आणि शनीच्या युतीचा काळ कन्या राशीसाठी फार संघर्षाचा असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला संघर्षाचा सामना करावा लागेल. तसेच, तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या वैवाहिक नातेसंबंधात तणाव जाणवू शकतो. तसेच, या काळात धनहानी देखील होण्याचे अनेक संकेत आहेत. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

सूर्य-शनीती युती धनु राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या काळात धनु राशीवर ढैय्याचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे हा काळ खूप कठीण असू शकतो. तसेच, तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होईल. वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे. तेसच, खर्चावर नियंत्रण ठेवावं. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीत सूर्य आणि शनीची युती होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी सूर्य ग्रहण देखील लागणार आहे. शनीचं राशी संक्रमण मीन राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीत साडेसातीचा दुसरा चरण असणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असेल. 

Shani Surya Yuti

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Shani Surya Yuti
Shani Surya Yuti

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Shani Surya Yuti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!