
वडाळा बहिरोबा – नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे काही अज्ञात चोरट्यांनी बॅटरी चे दुकान फोडुन चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी दि. २९ एप्रिल ते ३० एप्रिल रोजी मध्य रात्री येथील राम नवनाथ कर्डीले यांच्या मालकीचे सोलर बॅटरीचे येथे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना त्या ठिकाणी शटर उचकटलेले दिसून आले.

तसेच आतील सामानाची देखील उचका पाचक होऊन चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामध्ये रोख रकमेसह ६८.००० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला असल्याचे दिसून आले. नंतर चोरट्यांनी शेजारी असलेल्या विक्रम बाबासाहेब बेल्हेकर यांचे दुकानचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचे आढळून आले.

दि. ३० रोजी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र. नं. १०९/२०२५ बिएनएस चे कलम ३०५,३३१(४), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.