भेंडा – सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी मधील निकालामध्ये मागील वर्षीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून आले मागील वर्षी इयत्ता पाचवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा 23% एवढा होता.मागील वर्षी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 24 एवढी होती. यावर्षी इयत्ता पाचवी चा निकाल एवढा 38.05% लागलेला आहे. यावर्षी एकूण 48 विद्यार्थी 220 गुणांच्या पुढे असल्याचे दिसून येते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांच्या मिशन आरंभ या उपक्रमामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

माननीय शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब यांनी वर्षभर अभ्यासक्रम पूर्ण करणे ज्यादा तास सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर केंद्रावर विद्यार्थ्यांची परीक्षा या सूक्ष्म नियोजनामुळे निकालाचा टक्का वाढला पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. तालुक्यातील जे 48 विद्यार्थी 220 गुणांच्यापुढे आहेत त्यातील 28 विद्यार्थी हे सौंदळा शाळेचे आहे. इतर शाळेचे विद्यार्थी खालील प्रमाणे आहे.
- बेलपांढरी 10
- चिलेखनवाडी 2
- गळनिंब 1
- सलाबतपूर उर्दू 1
- बऱ्हाणपूर 1
- खेडले काजळी 1
- खडका 1
- मोरया चिंचोरे 1
- गीडेगाव 1
- वंजारवाडी 1
एकूण 48
शिवाजी कराड
गटशिक्षणाधिकारी, नेवासा

स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी आठवीचे भरीव काम या शैक्षणिक वर्षात झाले
मिशन आरंभचा परिणाम शिष्यवृत्ती निकालावर चांगल्या प्रकारे झाल्याचा दिसून येतो शिक्षक, पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.