सुखदेव फुलारी

भेंडा – नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पत्रकार सुखदेव फुलारी यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धि व सोशल मीडिया विभाग कार्यवाह पदी निवड झाली आहे. रविवार दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा संपन्न झाला. त्यात समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.

सुखदेव फुलारी

नवीन जिल्हा कार्यकारिणी अशी….

श्री.बाबासाहेब बुधवंत (जिल्हा अध्यक्ष), डॉ.प्रकाश गरुड व श्री. प्रमोद भारुळे (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.विष्णू गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष), श्री.विनायक सापा व श्री.देवदत्त साळवे (जिल्हा प्रधान सचिव), अड.अभय राजे (कायदेशीर सल्लागार), श्री.सुखदेव फुलारी (प्रसिद्धि व सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.शशिकांत गायकवाड (बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.कारभारी गायकवाड (जात पंचायत मुठमाती अभियान विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.दीपक शिरसाठ (संविधान जागर विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.बी.के.चव्हाण (विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह),प्राचार्य अशोक गवांदे (निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह),श्रीमती छाया बंगाळ (महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह).

सुखदेव फुलारी

यावेळी अशोक सब्बन,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे, अनिता सापा, प्रा. किसन शेवाळे, अरविंद गाडेकर, काशिनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, विनायक ताकपेरे, शशिकांत जाधव, भावना भारुळे, शब्बीरभाई पठाण, रामचंद्र जाधव, संजय शिरोळे, एड. अभय राजे, शुभम पात्रकंठी, दीपक शिरसाठ, अड. राहुल बुधवंत यांचे सह जिल्ह्यातील अकारा शाखाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुखदेव फुलारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुखदेव फुलारी
सुखदेव फुलारी
सुखदेव फुलारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुखदेव फुलारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!