नेवासा – कै सौ स्मिता ताईच्या स्मृती ला दिलेली स्वरांनी आदरांजलीआणि बहिणीसाठी भावाने लिहिलेल्या पुस्तकाची भावांजलीच्याया हृय कार्यक्रमात बल्लाळ बोबडे क्लासेस आणि कैलासवासी स्मिता देशपांडे स्मृती मंचच्यावतीने सहा विविध विभागातील साहित्यिकांना स्मृती पुरस्कार आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते देण्यात आले
गायिका निवेदिता आणि लेखिका असलेल्या कैलासवासी स्मिता देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ झालेल्या या कार्यक्रमात आमदार हिरे यांच्या हस्ते प्राध्यापक अविनाश बल्लाळ लिखित ‘माझी अध्यात्मिक अनुभूती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, नगरसेवक सुधीर कुलकर्णी, नगरसेवक बडधे ,नगरसेवक अतुल साने, श्रीमती आशाताई बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार मधुकर देशपांडे सौ शरदिनी देशपांडे, बल्लाळ प्रकाशनाचे दिलीप बल्लाळ सौ दिपाली बल्लाळ सौ निता बोबडे सौ अनघा बल्लाळ, आप्पासाहेब दातीर हे प्रमुख उपस्थित होते

सुकन्या जोशी प्रस्तुत ‘हे तर माझे गाणे’ या मध्ये विवेक केळकर आणि मृणालिनी मालपाठक यांनी स्मिताताई देशपांडे यांना आवडणाऱ्या गाण्याची सादरीकरण करून आदरांजली दिली
आमदार श्रीमती हिरे यांच्या हस्ते. संकेत खर्डीकर, वैभव धनावडे ,सुरेश खैर, हेमंत मेहते, सुनील बडगुजर, अर्चना गोरे या लेखकांचं त्यांचे उत्कृष्ट पुस्तकाबद्दल त्यांना कै सौ स्मिताताई देशपांडे पुरस्कार देण्यात आला
यावेळी अविनाश बल्लाळ यांनी पुस्तकाच्या लिखाण प्रवासाचे वर्णन सांगितले आणि हे पुस्तक बहिणीच्या इच्छेमुळे लिहिले गेले चे सांगितले यावेळी नाशिक 36 ॲपचे शार्दुल बल्लाळ यांनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जोशी जोशी यांनी केले तर सुबोध धर्माधिकारी यांनी आभार मानले
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोकराव पाटील ,सुधाकर गायधनी ,विवेक बोबडे सर ,सुधा मॅडम बडवे, गिरीश धारकर, सुनिता बोराडे व बोराडे सर , एच ए एल चे श्री व सौ डी आर जोशी, विद्या भालेराव ,शोभा बल्लाळ, यश बल्लाळ फाटक, मुकुंदराव मुंगी ,नितीन राव जोशी, अद्वैत लिखिते, विनय बोबडे, मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर हजर होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.