ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
स्नेहमेळावा

पाचेगाव फाटा – आठवणीचे उनाड पक्षी आज पुन्हा शाळेत फिरुन आले आणि आपल्या पावलांचे ठसे पुन्हा एकवार शोधू लागले.शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांनी कदिलेली शिक्षा आदी विषयांवर नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव येथे पार पडलेल्या स्नेह मेळाव्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पाचेगाव

काल पाचेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव येथे २००५–६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी किशोर नवगिरे, अमित काळे, नवनाथ गंधारे, वसंत दोंड, विक्रांत पवार, अमोल नांदे, महेंद्र तुवर, बाबासाहेब जाधव, नुरमुहम्मद पटेल, संतोष बनसोडे, सोनाली पारखे, राणी काळे, रोहिणी पवार, भाग्यश्री जाधव, वैशाली मतकर, आरती तुवर, दुर्गा तुवर, रोहिणी पाटील, रेश्मा माकोणे, वनिता डोळस, सोनाली थारोत, रूपाली शेंडगे, मंदा बोरूडे, अंबिका पडोळ, कविता साळुंके, नंदा पडोळ, शर्मिला तुवर, जयश्री काळे, अंजेली नांदे आदी उपस्थित होते.

पाचेगाव


वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मेळाव्यासाठी ठाणे, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर येथून येवून माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.प्रास्ताविक तुषार जाधव यांनी केले.सूत्रसंचलन रूपाली बाफण व संतोष नांदे यांनी केले तर अभार डॉ.पारस गोळेचा यांनी मानले.शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पाचेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाचेगाव
पाचेगाव
पाचेगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाचेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *