ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रक्तदान

प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्या असून रायगड येथील आंदोलनापासून सुरुवात करून महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराच्या घरी मशाल आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री यांच्या दारी हम तुम्हे रक्त खून देते हैं तुम हमे कर्ज माफी दे दो! ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील केली. त्याचबरोबर दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतीचे लागवड ते काढणी हे कामे एमआरजीएस मार्फत होण्यासाठी आंदोलन पुकारले आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रहार जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, विनोद सिंग परदेशी, ऍड पांडुरंग औताडे, दिव्यांग जिल्हाप्रमुख घाडगे,ऍड.पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारिणीने अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावी निवासस्थान परिसरात धर्मवीर संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी रक्तदान आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान

यावेळी लोणी चे ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिरात कर्जमाफी व दिव्यांगांना मानधन या मागणीची साकडे घालून रक्तदान शिबिर सुरू करण्यात आली कर्जमाफीची मागणी व घोषणा देऊन रक्तदान करण्यात आली सरकारने व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीचा सातबारा कोरा करण्याचा विसर सरकारला पडला असून महागाईच्या काळात दिव्यांगाना 1500 हजार रुपयात जीवन जगणे अवघड झाले आहे त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी अशी मागणी करण्यात आली यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रारजनशक्ती पक्ष व दिव्यांग विभागाचे सर्व पदाधिकारी लोणी येथे आलेले होते.

रक्तदान

यावेळी राहता, कोपरगाव, अहिल्यानगर येथील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते रक्तदात्यांनी रक्तदान करताना आम्ही रक्त आज देत आहोत याची दखल सरकारने घेऊन मागणीचा विचार करावा अन्यथा रक्त सांडण्याची वेळ येऊन देऊ नये असा इशारा दिला या रक्तदान शिबिराप्रसंगी अहिल्या नगर संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे,युवक जिल्हा उपाध्यक्ष अरविंद आरगडे, राहता तालुकाप्रमुख अमोल बाणाईत, श्रीरामपूर विधानसभा प्रमुख कराळे, युवक प्रमुख वाकले युवक अध्यक्ष विजय काकडे, दिव्यांग प्रमुख बन्सली, नेवासा तालुका अध्यक्ष अनिल विधाटे, उपाध्यक्ष पांडुरंग नवले, शहर प्रमुख विकी मिसर युवक तालुका अध्यक्ष विकास कोतकर, शंकर टकले दिव्यांग बांधव, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान
रक्तदान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रक्तदान
रक्तदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *