ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
सरपंच

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सन२०२१ रोजी पार पडली,त्यात सुरुवातीचा काळ गावातील निकिता चंद्रशेखर गटकळ यांनी दोन वर्षांचा सरपंच पदाचा विकास कार्यकाळ संपन्न करून राजीनामा दिला.त्यानंतर कृष्णा अशोक शिंदे यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळून आपल्या कार्यकाळात भरीव विकास कामे केली.
कृष्णा शिंदे यांनी १७ महिने सरपंच पदाचा कार्यकाळ करून राजीनामा दिला, पण शिंदे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर त्यांचे मित्र ग्रामपंचायतीचे विद्यामान सदस्य किशोर गारुळे यांना सरपंच पदाचा शब्द दिला होता,आणि त्याचीच पूर्तता म्हणून राहिलेले आठ महिने ग्रामपंचायतीचा कारभार गारुळे यांच्या कडे देऊन त्यांना सर्वनुमते सरपंच पदाची धुरा दिली.

सरपंच

मैत्री असावी तर राम-लक्ष्मण सारखी कारण या राजकारणाच्या रणभूमीत, जिथे पदासाठी नाती तुटतात, तिथे कृष्णा शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी दिलेला शब्द आज पाळून दाखवला.तो होता मित्रावर ठेवलेल्या निखळ विश्वासाचा! माझ्या नंतर माझा मित्र सरपंच होईल,हा शब्द त्यांनी केवळ दिला नाही, तर सन्मानाने पाळला असल्याने मैत्री यानिमित्ताने गावाला पाहायला मिळाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शुक्रवार रोजी किशोर गारुळे यांची बेलपिंपळगावच्या सरपंचपदी निवड ही फक्त राजकीय यशाची गोष्ट नाही – ती आहे मैत्रीच्या नात्याची, एकमेकांवरील श्रद्धेची, आणि नेतृत्वाच्या सच्चेपणाची जिवंत मिसाल या रूपाने गावकऱ्यांना बघायला मिळाली.रामाने लक्ष्मणावर प्रेमाने संपूर्ण अरण्य यात्रेत साथ दिली,तसेच कृष्णा शिंदे मित्राला पद दिलं.तो ही प्रेमाने, शब्द निभावून कृष्णा शिंदेंची दूरदृष्टी आणि किशोर गारुळे यांचे नेतृत्व ही जोडी गावासाठी एक मजबूत पायरी ठरणार असल्याची देखील गावात चर्चा झडत आहे. यानिवडी प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच
सरपंच

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सरपंच
सरपंच
सरपंच

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सरपंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *