नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील पाचुंदेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सभेत महिला सरपंचाच्या सासऱ्याकडून सबंधीत ग्रामस्थांना दमदाटी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत, नेवासे पोलिस ठाण्यात एन सी आर दाखल केली असल्याची माहिती संबधित ग्रामस्थ एकनाथ राजु माने व त्यांचे सहकारी शहाजी मेसु पठारे यांनी दिली असुन, यासंदर्भात गावातुन तसेच परिसरात सध्यातरी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे.

यासंबंधी पोलिसांत तक्रार दिलेल्या माहितीनुसार , शासकीय धोरणानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाई गोठयाच्या प्रकरणासंबधी सभेत माने व पठारे यांनी विचारणा केली असल्यावेळी ग्रामसेवकांच्या शेजारी महीला संरपचाच्या खुर्चीवर बसलेल्या सासरयांने कार्यालयातचं दमदाटी करून बाहेर काढले. यासंबंधी गटविकास अधिकारी तसेच पोलिसांत फोटोसह तक्रार केली असल्याची माहिती समोर आली असुन, पुढील तपास कुकाणा पोलिस चौकीचे हेड कॉ आंधळे करीत आहे.
ग्रामपंचायतीच्या सभेवेळी आम्ही व इतर ग्रामस्थ उपस्थित असतानां, सरपंच व त्यांचे सासरेंनी आमच्यासम स्यांबाबत समाधान कारक उत्तर न देता अरेरावी भाषेत द मदाटी केली असुन, यासंबंधी वरीष्ठ कार्यालयासं कळवले असुनही दुर्लक्ष केले जात असल्याने आम्ही आमरण उपो षणास लवकरच बसणार आहोत. तरीही यासंदर्भात वरि ष्ठ कार्यालयाच्या अधिकारी वर्गातुन दखल घ्यावी.
-नाथा राजु माने, शहाजी मेसु पठारे सामाजिक कार्यकर्ते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.