माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे जोरदार स्वागत
नेवासा – श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर पायी पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूरात दाखल झाला. हातात टाळ मुदुंग घेऊन दिंडीत भजन आणि अभंग गात विठ्ठलाचे नामस्मरण करत पंढरपूरकडे वारकरी रवाना झाले. या पायी दिंडी सोहळ्यामध्ये नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील २० ते २५ दिंड्यांचा समावेश असून, या दिंडी सोहळ्यात १० ते १२ हजार भाविक सहभागी झालेले आहे. श्रीक्षेत्र नेवासा दिंडीचे ठिकठिकाणी मोठे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांबरोबरच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा सहभाग आहे.

ज्येष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे, कैलास शिंदे यांच्यासह मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे, बाजार समितीचे माजी सभापती श्रीरंग हारदे, अशोकराव हारदे, दत्तात्रय सर्जे, रोहिदास गारूळे, नंदू दहातोंडे, सुरेश ढोकणे, विठ्ठल मैंदाड, बाळासाहेब सावंत, किशोर सोनवणे, बाबासाहेब भगत, संजय धनक, तोगे यांच्यासह नेवाशातील शेकडो भाविक या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. या दिंडी सोहळ्यात सर्व जातीधर्माचे लोक एकत्रितपणे सहभागी झालेले असून, या दिंडी सोहळ्याला गेल्या अनेक वर्षानुवर्षांची मोठी परंपरा लाभलेली आहे. हा दिंडी सोहळा शिस्तबद्धपणे पंढरपूरकडे आगेकूच करत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.