“माणुसकी फाउंडेशन” च्या मदतीने अनाथ विद्यार्थ्याच्या शिक्षणाला मिळतेय प्रोत्साहन
करजगाव – सेवाभावी विचारातून ग्रामीण, आदिवासी, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणा
साठी सर्वानी पुढे येण्याची गरज आहे.
“माणुसकी फाउंडेशन” च्या वतीने ब्राम्हणी (ता राहुरी) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहातील अनाथ, निराधार विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, उजळणी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष योगेश जाधव ,सौ.ॠतुजा जाधव उपस्थित होते.
आजवर या फाउंडेशनने कळंकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ठाकर व भिल्ल समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग, शिवणी, भिल्लवस्ती शिवणी आणि शिवणी फाटा येथील विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊ, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहातील अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, उजळणी पुस्तिका अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

शिराळा येथील चांदोली जंगल परिसरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , जामखेड येथील निवारा बालगृहाला प्रोजेक्टर देऊन डिजिटल शिक्षणाची सुविधा, स्नेहवन जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट, स्नेहछाया, तसेच उत्कर्ष बालघर, अहिल्यानगर यांसारख्या संस्थांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे.
दुर्गम भागांतील रस्त्यांची गैरसोय, जंगलातून जाणाऱ्या वाटा आणि हवामानातील अडथळे झुगारून संस्थेचे कार्यकर्ते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी पोहचतात.
या कामामध्ये संस्थेचे सदस्य निःस्वार्थपणे सहभागी होतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या प्रवासात मोलाची साथ देतात. “माणुसकी फाउंडेशन” ही संस्था आजच्या समाजात एक सकारात्मक उदाहरण म्हणून पुढे येत आहे. अध्यक्ष विशाल लाखुटे, कोषाध्यक्ष धनंजय शिंदे यांचे सहकार्य मोलाचे ठरते.
शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येक मूल सामील व्हावे व गरजु विद्यार्थ्यांना संधी, सुविधा आणि शिक्षणाचा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या प्रवासात मोलाची साथ देण्याचा प्रयत्न राहिल.
– योगेश जाधव (उपाध्यक्ष, माणुसकी फाउंडेशन )


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.