ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
आत्मदीप हॉस्पिटल

नेवासा – नेवासा फाटा येथील आत्मदीप मेडिकल फाऊंडेशन व बजाज हॉस्पिटल संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.२ जुलै रोजी मोफत किडनी प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन आत्मदीप हॉस्पिटल नेवासाफाटा येथे करण्यात आले असल्याचे माहिती आत्मदीप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी दिली.
        नेवासाफाटा येथील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मोफत किडनी ट्रान्सप्लाट(प्रत्यारोपण)शिबिराचे उदघाटन संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते व माजी खासदार भाजपचे युवा नेते  डॉ.सुजयदादा विखे पाटील,सत्कार मूर्ती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

आत्मदीप हॉस्पिटल

या शिबिरात किडणीच्या सर्व आजारावरील तसेच डायलिसिस सुरू असणाऱ्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी बजाज हॉस्पिटलचे मुख्य किडनी विकार व
प्रत्यारोपण तज्ञ डॉ.समीर महाजन व किडनी विकार तज्ञ,डॉ.निखिल इंगळे,डॉ बजाज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज फर्नाडिस,वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय रोटे हे या शिबिरात रुग्णांची किडणी विकार व डायलिसिस सुरू असलेल्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
         या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांनी त्वरित आत्मदीप हॉस्पिटल प्रकाश शेटे 91391 35580 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आत्मदीप मेडिकल फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे, आत्मदीप फाऊंडेशनचे विश्वस्त अँड. सौ.प्रियंका काळे,विश्वस्त दादासाहेब कोकणे विनोद ठाणगे यांनी केले आहे

newasa news online
आत्मदीप हॉस्पिटल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आत्मदीप हॉस्पिटल
आत्मदीप हॉस्पिटल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आत्मदीप हॉस्पिटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *