नेवासा – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या बैठक काल रविवार दिनांक २९रोजी शासकीय विश्राम गृह श्रीरामपूर येथे कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या . त्याप्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे म्हणाले की शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे फक्त शेतकरी कुटुंबातीलच व्यक्तींना माहीत असते त्याच अनुषंगाने नेवासा तालुक्यातील धामोरी गावचे प्रगतीचे शेतकरी श्री आदिनाथ रावसाहेब पटारे यांची नेवासा तालुका सचिव पदी ,तर रस्तापूर गावचे प्रगतीशील शेतकरी श्री विवेक पोपटराव अंबाडे यांची तालुकाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे व जिल्हाध्यक्ष रावसाहेब घोगरे व पदाधिकारी यांनी केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन कृषी परिषदेच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.यावेळी कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश तरकसे,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब घुमरे ,राजेंद्र लोंढे , नानासाहेब डौले, शंकर कनगरे व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे जिल्हा भाजप उपाध्यक्ष सचिन देसरडा, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, भाजप वैद्यकीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कोलते व इतर सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्याकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.