अहिल्यानगर – शनीशिंगणापुरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यप्रकरणी अहिल्यानगरचे भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जात शनीशिंगणापुरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करून सक्षम प्रशासकाची नेमणुक करावी. विश्वस्त मंडळ यांनी केलेल्या अपहाराची सखोल चौकशीसाठी तात्काळ समितीची नेमणुक करण्यात यावी. बनावट अॅपव्दारे झालेली फसवणुक ही देवस्थानची व भाविकांची असल्याने त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सायबर क्राईम, मुंबई व महाराष्ट्र राज्य इ. ओ. डब्लू, मुंबई यांच्या मार्फत तपास करण्याचे योग्य ते आदेश द्यावेत, अशा मागण्या शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी केल्या आहेत.

विशाल सुरपुरिया यांनी दिलेल्या ताक्रारीत नमूद केले आहे की, शनीशिंगणापुरच्या देवस्थान व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक व इ. ओ. डब्लू. मुंबई यांच्याकडेही पत्र पाठवुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र आजपर्यंत सदर प्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसुन सदरच्या विश्वस्त मंडळाला कुठलाही कायद्याचा धाक राहिलेला नाहीये.
त्यामुळे हे भ्रष्टाचारी विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करण्यात येऊन सक्षम प्रशासकाची व चौकशी समितीची त्वरित नेमणुक करावी, अशी मागणी अॅड. अमित सुरपुरिया व अॅड. स्वाती जाधव यांच्या मार्फत केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.