ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रस्ता

प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही.

नेवासा तालुक्यातील करजगांव हद्दीतील कांगोणी वाटेवरील पानंद रस्ता खुला करण्यासाठी नंदू दादा देवखिळे या करजगाव येथील शेतकऱ्याने आपल्या घरी बसून रस्त्याच्या  प्रश्नासाठी उपोषण सुरू केले आहे.तहसीलदार साहेबांनी या रस्त्याच्या प्रश्नासाठी मोजणी करून देऊ असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे उपोषण आपण घरी बसूनच करत असल्याने उपोषणकर्त्या शेतकऱ्याने सांगितले.
    याबाबत प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात करजगाव येथील शेतकरी नंदू दादा देवखिळे यांनी म्हटले आहे की करजगाव येथील वडिलोपार्जित गट न १८६ मधून ये जा करण्यासाठी सुरू असलेला रस्ता बंद केला. यामुळे माझी शेती पडीक पडलेली आहे.सदरचा रस्ता मिळण्याबाबत नेवासा न्यायालयामध्ये नंदू दादा देवखिळे यांनी दावा दाखल केला होता, सदर दाव्याचा निकाल सुद्धा समोरच्या पार्टीने सदरचा रस्ता वहीवाटी खुला करून द्यावा त्यास कुठलीही हरकत अथवा अडचण आणू नये अशी ही समज देण्यात आली.

रस्ता


परंतु न्यायालयाच्या निकाल लागूनही आडदांड प्रवृत्तीच्या व्यक्तीने निकाल मानला नाही.सोनई पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती, परंतु पोलीस स्टेशनकडूनही कुठलीही दखल घेतली गेली नाही. तहसीलदाराकडूनही रस्ता खुला करणेबाबत अनेकदा समक्ष भेटून अर्ज देऊनही दखल घेतली जात नाही, पोलीसही याबाबत मदत करत नाही यामुळे मी आमरण उपोषण करत आहे. माझ्या जीवितास बरे वाईट झाल्यास तहसीलदार व पोलीस निरीक्षक जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे.
तर गट नंबर ४४ ते २५२ पर्यंत कांगोणीकडे जाणारा पानंद रस्ता खुला करुन मिळावा यासाठी आपण या अगोदर ही निवेदन दिले होते,माझी जमिन गट नंबर २०२ मध्ये आहे. सदर जमिनीत जाण्यासाठी व शेती साहित्य बाहेर नेण्यासाठी अरुंद रस्त्यामुळे अडथळा होत आहे
     या रस्त्याच्या प्रश्नासाठी गेल्या वीस वर्षांपासून मी तहसीलदार यांना अर्ज करून मागणी करत आलो आहे
२०२१ साली मी या रस्त्यासाठी उपोषण देखील केले होते
त्यावेळी तहसीलदार यांनी रस्ता मोजणी करून खुला करून देऊ असे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत याबाबत मला न्याय मिळाला नाही

रस्ता


     आठ दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानुसार व दिलेल्या तारखेनुसार मी पानंद रस्ता खुला करण्यात यावा म्हणून माझ्या घरीच आमरण उपोषण सुरू करत आहे यामध्ये मला जो त्रास होईल त्यास प्रशासनच जबाबदार राहील असा ईशारा शेतकरी नंदू दादा देवखिळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
   आमरण उपोषणाबाबत शेतकरी नंदू दादा देवखिळे यांनी सदरचे निवेदन नेवासा तहसीलदार,सोनई पोलीस निरीक्षक,आरोग्य अधिकारी सोनई,भूमी अभिलेख कार्यालय यांना दिले आहे.वरील दोन्ही ही रस्त्याच्या प्रश्नांबाबत मी आपल्या घरीच बसून आमरण उपोषण शेतकऱ्याने सुरू केल्याने हा पानंद रस्ता खुला करावा अशी मागणी आता नागरीकांकडून केली जात आहे

रस्ता
रस्ता

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले