ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वेलनेस सेंटर

नेवासा | सचिन कुरुंद नेवासा शहरातील अहिल्यानगर प्रभागामध्ये वेलनेस सेंटरच्या आरोग्य सल्लागार श्रीमती मन्नाबी शेख-बागवान मॅडम यांनी सूरु केलेल्या माऊली वेलनेस फिटनेस सेंटरचे उदघाटन वेलनेसचे बीड येथील मुख्य प्रशिक्षक सलीम शेख सर यांच्या हस्ते व महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. संतुलित आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीराला निरोगी व सुंदर बनवा असे आवाहन आरोग्य सल्लागार सलीम शेख सर यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बीड येथील फिटनेस आरोग्य सल्लागार व प्रशिक्षक सलीमभाई शेख,बीड येथील आदिनाथ खेडकर,बीडचे पत्रकार अनिल गायकवाड,आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले, प्रशिक्षिका श्रीमती गीताताई गायकवाड,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण,दत्तात्रय गायकवाड,जिम ट्रेनर शाहरुख,विशाल इंगळे,होमगार्ड शकील शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

वेलनेस सेंटर


यावेळी वेलनेस सेंटरच्या श्रीमती मन्नाबी शेख-बागवान यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.या भागातील महिलांच्या निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी आपण वेलनेस सेंटर हे सुरू करत असून दररोज पहाटे पासून ते सकाळपर्यंत तसेच सायंकाळी व्यायामाद्वारे मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे मन्नाबी शेख बागवान मॅडम यांनी यावेळी बोलतांना जाहीर केले.
यावेळी झालेल्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी मुख्य प्रशिक्षक सलीम शेख सर,आदिनाथ खेडकर,प्रशिक्षिका श्रीमती गीता गायकवाड नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी वेलनेस व फिटनेसच्या माध्यमातून मिळणारे फायदे विषद करून वेलनेस सेंटर हे आरोग्य मंदिर असून अहिल्यानगर येथील महिलांनी या संधीचा लाभ घ्या व आरोग्यदायी जीवन जगण्याचा संकल्प करा असे आवाहन केले.

वेलनेस सेंटर


यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी श्रीमती सय्यद भाभी,रिटा इंगळे,पुजा अनारसे,वर्षाताई परदेशी,
मीनाताई लोखंडे,मगंलताई घोडके,नंदाताई उगले,योगिता केदंळे, कल्पना जगताप, प्रतिभा चक्रनारायण,सुवर्णा गायकवाड, बेबीताई आदमने, सुवर्णा शिंदे, वृंदावनी कुरुंद स्वाती ताठे, सिंधूताई शुळ यांच्यासह अहिल्यानगर प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम संयोजक श्रीमती मन्नाबी शेख मॅडम यांनी उपस्थित महिलांसह मान्यवरांचे आभार मानले.

वेलनेस सेंटर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वेलनेस सेंटर
वेलनेस सेंटर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वेलनेस सेंटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *