पाचेगाव फाटा – नेवासे तालुक्यातील पूनतगाव येथील ब्राह्मणाथ फार्मा प्रा लि या औषधी वनस्पती शेती व उत्पादन युनिटला नुकतीच मान्यवरांची भेट झाली. यावेळी नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल,सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार, रखमाजी लांडे यांनी भेट माहिती घेतली.यावेळी पुनतगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वाकचौरे, ग्रामविकास अधिकारी सतिश मोटे, राजेंद्र वरुडे, विलास वाकचौरे, अनिल वाकचौरे, वसीम शेख, बापूसाहेब लांडगे आदी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची शेती, शासनाच्या वनस्पती लागवडी साठी असणार्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हर्बल फार्मिंग चे क्लस्टर डेव्हलपमेंट व शाश्वत शेती पद्धती यावर सखोल चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. गावामधे औषधी वनस्पती लागवड व त्यांच्यापासून विविध उत्पादने निर्मिती , याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ कृषी विकास नव्हे तर आरोग्यवर्धक व नैसर्गिक उपचार पद्धतींचाही प्रसार होणार आहे.यावेळी कंपनी चे डायरेक्टर डॉ आशिष पुंडे व डॉ पारस गोलेचा यांनी सर्वाना संस्थे कडून बनवल्या जाणार्या विविध उत्पादनाची माहिती सर्वांना दिली. मान्यवरांनी येथे गोशाळामध्ये केल्या जाणार्या देशी गोवंश पालनाबद्द यावेळी कौतुक करून ग्रामीण विकासाकडे एक सकारात्मक वाटचाल असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील आधिकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.