भानसहिवरा | सचिन कुरुंद – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे – महसूल मंडळ भानसहिवरे यांच्या वतीने आणि तहसील कार्यालय, नेवासा यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था, भानसहिवरे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.
शिबिरामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी (डोमिसाईल) आणि इतर शैक्षणिक दाखले, नवीन व सुधारित शिधापत्रिका (रेशन कार्ड), संजय गांधी निराधार योजना, तसेच जिवंत ७/१२ मोहीम अंतर्गत वारस नोंद झालेल्या व्यक्तींना ७/१२ उताऱ्यांचे थेट वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय पंचायत समिती व कृषी विभागाच्या योजना, AgriStack योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-KISAN) यांचाही लाभ शिबिरात दिला जाणार आहे.

भानसहिवरे, खुणेगाव, मुकिंदपूर, मक्तापूर, पिचडगाव, सौंदाळा, नागपूर, उस्थळदुमाला, हंडीनिंमगाव, बाभुळवेढा, रांजणगाव, कारेगाव या महसूल मंडळातील गावांतील नागरिक, विद्यार्थी आणि लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील व नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवण्याची ही सुवर्णसंधी असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.