पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथिल लक्ष्मी माता ची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु असलेली परंपरा, आखाड महिन्या मध्ये तिसऱ्या मंगळवारी ही देवींची यात्रा भरते. यावेळी पहाटे गावातील शेकडो तरुण गोदावरी चे पवित्र गंगाजल आणून देवीला स्नान घालतात त्यांनंतर विधिवात अभिषेक करून नैवैद्य दाखवण्यात आला. दिवसभत गावातील सर्व महिलांनी देवीला नैवैद्य दाखवला. सायंकाळी 5 वाजता ढोल तशाच्या गजरात गाडा मिरवणूक निघाली, गावातील मुख्य वेशित पूजन करून त्यांनातर लक्ष्मी मातेच्या मंदिरात हार्दिक गाडा नेण्यात आला. तेथे होम पुजन झाले गावामध्ये प्रथमच गेल्या अनेक वर्षांपासून जी गर्दी बघायला मिळत नव्हती तिचा उच्चंक यादिवशी बघायला मिळाला, हजारो भाविक यादिवशी या यात्रेत सहभागी झाले होते, गावातील तरुण एकत्र आल्याने या यात्रेची मोठी शोभा वाढली, गावातील सर्व भाविकांनी यावेळी या तरुण्णाचे कौतुक केले. सायंकाळी देवीच्या मंदिरात देवीचा जागर करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.