ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शनैश्वर

नेवासा – शनैश्वर देवस्थाने केलेल्या नोकर भरती विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चौकशीच्या -आदेशामुळे मुंबई धर्मादाय कार्यालयात सुनावणी सुरू झालेली आहे. यात धर्मदाय आयुक्तांनी २५ जुलै ही तारीख दिली असून विश्वस्तांनी नोकरभरती विषयी म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी केलेल्या नोकरभरती प्रकरणी पूर्ण लेखाजोखा ‘मांडुन या प्रकरणी चौकशीचे लगेच आदेश दिले. दुसऱ्याच दिवशी मुंबई धर्मादाय कार्यालयाने शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना दिनांक १८ रोजी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले.

शनैश्वर

मुंबई येथील अॅड. समीर जाधव यांनी देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने उपस्थित राहून प्रमाणित नकलांची मागणी केली यावर ही मागणी मान्य करून म्हणणे मांडण्यासाठी आठ दिवसांची म्हणजेच शुक्रवार २५ जुलै ही तारीख देण्यात आली. विश्वस्तांकडुन याविषयी माहिती घेतली असता २३ जुलैपर्यंतही या प्रमाणित नकला मिळाल्या नसल्याचे समजते मग पुन्हा एका दिवसात या नकला मिळाल्या तरी त्याची माहिती घेऊन विश्वस्त व वकील म्हणणे सादर कसे करणार? यात शंका आहे व पुन्हा पुढील तारीख पडण्याची शक्यता जास्त वाटत असल्याचे जाणवते.

शनैश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनैश्वर
शनैश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनैश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *