नेवासा- हुंड्यासाठी विवाहितेचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करत तिला घराबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी लेखानगर, सावेडी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती सचिन विलास सांगळे, सासरे विलास लक्ष्मण सांगळे, सासु कांताबाई विलास सांगळे, भाया राहुल विलास सांगळे, जाऊ स्वाती राहुल सांगळे (सर्व रा. निंभारी, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह ५ जुलै २०२२ रोजी सचिन विलास सांगळे याच्याशी झाला होता. सुरूवातीचा एक महिना सर्वकाही सुरळीत असताना त्यानंतर सासरी तिच्यावर २० लाख रूपये हुंड्याची मागणी करण्यात येऊ लागली.

फिर्यादीच्या सांगण्यानुसार, पत्तीसह सासू-सासरे, दीर व जाऊ यांनी भरूच (गुजरात) येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आण, अन्यथा तुला तुझ्या पतीजवळ राहू देणार नाही, अशी धमकी दिली. या दरम्यान वेळोवेळी १५ लाख रूपये तिच्या वडिलांकडून घेण्यात आले. तरीही तिचा मानसिक छळ केला गेला. याशिवाय पती सचिन यास व्यसन असून, तो शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच एका प्रसंगी रक्षाबंधन सणाच्या दिवशी गळ्यातील ११ तोळे सोनं सासूच्या ताब्यात ठेवायला लावून, तिला माहेरी आणून सोडण्यात आले व परत घेऊन न जाता तिला फोनसुध्दा उचलले नाहीत, असेही फिर्यादीत नमूद आहे. पुढे पीडितेच्या वडिलांनी मेहुण्याच्या मध्यस्थीने सासरच्या मंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर पीडितेने भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली. तेथेही समेट न झाल्याने अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.