ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दहीहंडी
दहीहंडी

नेवासा – नेवासा तालुका श्रीरामराज्य उत्सव समितीच्या वतीने यंदा भव्य दहीहंडी उत्सव २०२५ सोबतच सामाजिक रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दहीहंडी

सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, वायरमन तसेच पोलीस बांधव यांचा सन्मान करण्याचा समितीचा उद्देश आहे. हे सर्वजण ऊन–पाऊस न बघता ३६५ दिवस समाजाची निस्वार्थ सेवा करतात, मात्र त्यांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे दहीहंडीच्या औचित्यावर त्यांना ‘रक्षा’ बांधून सन्मानित केले जाणार आहे.

दहीहंडी

या कार्यक्रमात सर्व न्यातीप्रमुख तसेच पत्रकार बांधवांनाही ‘रक्षा’ बांधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. विशेष पाहुणे म्हणून बाभळेश्वरचे महंत ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के यांचे मार्गदर्शन होणार असून ते रक्षाबंधन, गोपालाष्टमी व गोपालकाला या सणांचे महत्व उलगडून सांगणार आहेत.

दहीहंडी

महाराजांच्या प्रवचनानंतर उपस्थितांना काला व दूध यांचा प्रसाद दिला जाईल. श्रीरामराज्य उत्सव समितीने सर्व नागरिक, महिला व युवक–युवतींना या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहीहंडी
दहीहंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहीहंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *