भेंडा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडा खुर्द येथील इयत्ता ३ री मधील विद्यार्थिनी सिद्धीका रोहिदास नवले हीस कौशल्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्ले पाटील अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या वतीने हा पुरस्कार सिद्धीका हिला देण्यात आला,
पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी ,सन्मानपत्र व रोख रक्कम असे होते.
भारताचा ७९ वा स्वतंत्रता दिवस उत्साही वातावरणात पार पडत असताना
आर्ले पाटील अर्बन पतसंस्थेचे संस्थापक डॉक्टर गणेश आर्ले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला .प्रसंगी भेंडा खुर्दच्या सरपंच सौ. वर्षा नवले ,उपसरपंच सागर महापूर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.मले सर, श्री. पंडित सर ,श्री. डवले सर , सौ.धानापुणे मॅडम वतसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच यापुढेही प्रत्येक वर्षी हा कौशल्य आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात येणार आहे.दर वर्षी असा पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांना आर्ले पाटील पतसंस्था देणार असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक डॉक्टर गणेश आर्ले यांनी या वेळी माहिती दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

