गणेशवाडी –येत्या शनिवारी 23 ऑगस्ट रोजी शनी आमावस्या असल्याने शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये आढावा बैठक प्रशासनाने घेतली. यावेळी प्रांतधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी शेवगावचे पोलीस उपाधीक्षक गणेश उगले व देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. के दरंदले तसेच सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर असे शनीअमावस्या 23 ऑगस्ट रोजी येत असल्याने शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. शनी आमवस्या निमित्त देश विदेशातून लाखो शनी भक्त शनीदेवाचे दर्शन करण्यासाठी शनिशिंगणापूर येथे येत असतात.

यावेळी चौथऱ्यावर जाऊन स्वयंभु शनी मूर्तीला तेल अभिषेक करतात.यावेळी मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांचे दर्शन सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी दि. 22 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या महाआरतीपासून ते 23 ऑगस्ट पर्यत सुरक्षा व गर्दीच्या कारणामुळे शनी चौथरा दर्शन व तेल अभिषेक साठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे आढावा बैठकित ठरवण्यात आहे.
यावेळी प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांनी शनी अमावस्या निमित्त भाविकांच्या सुविधे कडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.यावेळी आरोग्य,पिण्याचे पाणी, वाहनतळ,बस स्थानक व वीज पुरवठा आधी प्रमुख सुविधांवर लक्ष देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी सुधीर पाटील, शेवगावचे उपाधीक्षक गणेश उगले, देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सपोनि आशिष शेळके, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. के दरंदले व पोलीस पाटील सयाराम बानकर आदी या बैठकीला उपस्थित होते.
शनी अमावस्या निमित्त शनी चौथरा व जनसंपर्क कार्यालय यादिवशी प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेतला गेला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.