डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी सहा. पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांच्या हस्ते लक्ष्मीबाई डोके विद्या मंदिर( निर्मल नगर) येथे आज वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वही यासारख्या शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी श्री. बुधवंत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की ,आपसात मैत्रीचे नाते ठेवा आणि अभ्यासू वृत्ती जपा. ज्यामुळे चुकीचे पाऊल पडणार नाही. या विद्यालयातील विद्यार्थी हे गरीब आणि मजूर वर्गातील असून शिक्षण घेणारे आहेत. संस्था कुठल्याही प्रकारचे डोनेशन घेत नाही.

मोफत प्रवेश दिला जातो. त्यामुळे परिसरातील पालकांनी या विद्यालयात आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यावा असे आवाहन यावेळी बुधवंत यांनी केले.तसेच मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांचेही यावेळी त्यांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शपथ देण्यात आली.
यावेळी पॉल भिंगारदिवे सर,वाळके मॅडम, संभाजी पवार, मंजू नवगिरे, संजोत बर्वे,आशा धामणे, मंदाकिनी पांडुळे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार, अभिषेक करमाळे,किरण जाधव, राणी राऊत आदी शिक्षक वर्गाने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.