नेवासा-घरातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी महाराजांनी तीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना प्रवरासंगम परिसरात घडली. या महाराजाविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब तुकाराम मुंडे (वय ४०, रा. गायकवाड जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे या भोंदूगिरी करणाऱ्याचे नाव आहे. नेवासे शहरात बुधवारी पहाटे त्याला अटक केली आहे.
तेलंगणा राज्यातील ट्रकचालक परमेश मोतिराम मेघावत याने फिर्याद दाखल केली आहे.
परमेश यांच्या शिवा या मित्राची बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका अनोळखी महाराजांची ओळख झाली. घरातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने शिवाकडून त्याने १० हजार रुपये घेतले. त्याच्या घरी तेलंगणात पूजाही केली. त्यामुळे परमेश यालाही पूजा करण्याचे सांगितले.

अनोळखी महाराजांबरोबर १५ ऑगस्ट रोजी फोनद्वारे संवाद साधला असता त्यांनी प्रवरासंगम येथील जुन्या पुलावर १७ तारखेला येण्याचे सांगितले. त्यानुसार शिवा पांचाल सुतार, नरसिंम मल्लाया अकुला प्रवरासंगमच्या जुन्या पुलावर गेले. काही वेळेनंतर अनोळखी महाराज हातात लाकडी दांडा घेऊन आला.
सर्वजण प्रवरासंगम नदीजवळ गेले. तेथे महाराजाने बाजूला घेत तेलंगणा येथील घरी पूजा करण्याची काही गरज नाही. तुझी पूजा येथे करतो, असे सांगून पिशवीतील तीन लाख रुपये खाली ठेवण्याचे सांगत नदीचे पाणी आणायला सांगितले. मित्रांना डोळे झाकून नामस्मरण करण्यास सांगितले. पाणी घेण्यासाठी जात असताना महाराज पैसे घेऊन पळून गेला.
नेवासे शहरातील श्रीरामपूर रस्त्यावर बुधवारी पहाटे त्यास पकडण्यात आले. न्यायालयाने २१ पर्यंत त्यास पोलिस कोठडी सुनावली. यांनी केली कारवाई.. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, हवालदार अजय साठे, नारायण डमाळे, गणेश जाधव, राहुल गायकवाड व सायबर सेलचे सचिन धनाड यांनी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.