
नेवासा – सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेच्या मार्गाने मिरवणूक काढून कोणत्याही मंडळांकडून डीजेचा वापर केल्यास ‘त्या’ मालकासह गणेश मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला.

गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलेली असून शांततेच्या मार्गाने सार्वजनिक गणेश मंडळांनी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या गुण्यागोविंदाने पारंपारिक वाद्याचा वापर करून गणेशोत्सव मिरवणूक साजरी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे. कोणत्याही मंडळांनी डीजेचा वापर केल्यास कडक करवाई करण्यात येणार असून, नेवासा पोलीस या गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.