अपघात

गणेशवाडी – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर सध्या साक्षात यमलोकात जाण्याचा मार्ग बनला आहे. गेली अनेक दिवसांपासून या रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. कुणाचे हात पाय गेले तर कुणाला आपला जीव गमवावा लागला. तरी या गेंड्यांची कातडे असणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही. या परिसरात अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी खासदार आमदार या रस्त्यावर येजा करतात परंतु त्यांना सुध्दा हे दिसत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता भेडसावत नसेल तर नवलच. या साठी घोडेगाव ग्रामस्थांनी दि. २७ सप्टेंबर रोजी रास्ता रोको केला होता. त्यावेळी जागतिक बॅक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पाटील यांनी दहा दिवसांत रस्ता दुरस्ती केली जाईल असे लेखी पत्र दिले होते.

अपघात

या रोजी एक महिना उलटुन गेला तरी रस्ता दुरुस्त झाला नाही. त्यांनी जनतेची खोटे आश्वासन देऊन दिशाभूल केली आहे. त्यांच्या या हलगर्जीपणा मुळे आरती कोवा या दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी निघालेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. तरी त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा संघटक नेवासा चे पंकज लांभाते तसेच संदिप भाऊसाहेब येळवंडे, अलिभाई जुम्माभाई शेख, संभाजी दत्तात्रय बोरुडे, कल्याण दामोदर इखे,सदानंद बहीरनाथ गाडेकर यांनी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *