
नेवासा – नेवासा येथील पाणी जार व्यावसायिक श्री अंबादास पोपट लोखंडे रा लोखंडे गल्ली, ह.मु. पावन गणपती मंदिर शेजारी नेवासा फाटा याने अ. नगर जिल्हा कोर्टाने फिर्यादीस सहा लाख रुपये एक महिन्याच्या आत व न दिल्यास दोन महिने सक्त मजुरीची शिक्षा आदेश बजावले.
सविस्तर वृत्त असे कि, अ. नगर जिल्हा कोर्ट येथील याचिका क्रमांक 6399/2022 अंतर्गत आरोपी अंबादास पोपट लोखंडे याने फिर्यादीस उधार घेतलेल्या रकमेपोटी साडे सहा लाखाचा चेक दिला होता, परंतु सदर चेक न वाटल्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्यामुळे फिर्यादीने सन 2022 मध्ये आरोपी अंबादास पोपट लोखंडे याच्या विरोधात अ. नगर जिल्हा न्यायालय येथे याचिका दाखल केली होती.

मध्यंतरी आरोपी वा फिर्यादी मध्ये तडजोड होऊन, आरोपी अंबादास पोपट लोखंडे याने फिर्यादीस त्या प्रमाणे काही रक्कम दिली व परत पुढील रक्कम देण्याचे नाकारले. या याचिकेवर अतिरिक्त मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. इनामदार यांनी आरोपी अंबादास पोपट लोखंडे याला एक महिन्याच्या आत फिर्यादीस सहा लाख भरपाई देण्याचे आदेश दिले, भरपाई न दिल्यास दोन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा बजावली आहे.

या याचिकेत आरोपी कडून ऍड अण्णासाहेब अंबाडे यांनी तर फिर्यादी कडून ऍड भूषण बऱ्हाटे, ऍड नितीन अडसूरे, ऍड वैभव वाकचौरे यांनी कामकाज पहिले. या निकालामुळे चेक देऊन फसवणूक करण्याऱ्या वर्गात जबर चपराक बसली असून या निकालाबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.यामुळे चेक देऊन फसवणूक करण्याचे समाजातील प्रमाण कमी होईल असे मत अनेकांनी बोलून दाखविले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

