
नेवासा – मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना बालपणाचा आनंद तसेच व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ सह विविध वस्तूंचे स्टॉल लावून त्यांना ‘कमवा व शिका’ यां गोष्टींची जाणीव होण्यासाठी नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विवेकानंदनगर येथे बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या बाल मेळाव्यात 12 हजार 465 रुपयांची उलाढाल झाली.

शनिवार 10 जानेवारी 2026 सकाळी 9 ते 12 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बदामबाई गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर सर यांचे हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका भारती परदेशी, कृष्णा परदेशी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सचिन भांड, मृणाली मुळे मॅडम, सतीश मुळे सर, जय श्रीराम विद्यालयाच्या शिक्षिका पार्वती नाणेकर, सुषमा कोरेकर, कावेरी नाबदे, अश्विनी नाबदे, पत्रकार शंकर नाबदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मैंदाड, विठ्ठल मैंदाड, अरविंद घोडके सर, सतीश म्हस्के, अनिल परदेशी, गणेश नाबदे आदी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आनंदात भर टाकली.

मेळाव्यात सुमारे 50 विद्यार्थ्यांनी दुकाने थाटली होती. भाजीपाला, शालेय साहित्य, व किराणा दुकान, खाऊचे स्टॉल लावून वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीस मांडले होते. अवघ्या तीन तासामध्ये 12 हजार 465 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. या मेळाव्यात माता-पालक, ग्रामस्थ व पालकांनी साहित्य खरेदी खरेदी करत खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत चौव चाखून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन मेळाव्याची शोभा वाढवली. तर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता घोलप, शिक्षिका अर्चना जंगम, सुनिता ननवरे, कविता बुचुडे यांनी यांनी बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

