हंडीनिमगाव:- सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव येथे नुकताच दिनांक ८ ते १० जानेवारी २०२६ रोजी वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. टि. एन. गायकवाड पाटील (मा. कक्षा अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर), श्री. भाऊसाहेब अंबाडे साहेब ( चेअरमन, रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल), श्री. पिटर बारगळ सर ( प्रिन्सिपल, रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल) हे होते. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व मैदानावर नारळ फोडून क्रीडा दिनाला सुरुवात झाली.

कार्यक्रमा निमित्ताने दुसरी, पाचवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. क्रीडा दिनानिमित्त हाऊस नुसार परेड, विविध मॅचेस घेण्यात आल्या यामध्ये छोटा गट १ ली ते ४ थी व मोठा गृप ५ वी ते १० वी असे दोन गृप करण्यात आले होते. यामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लिंबू-चमचा, हर्डल रेस, रस्सीखेच, रनिंग रेस, रिले, सॅक रेस आदींचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रेड हाऊस, ग्रीन हाऊस, मरून हाऊस व ब्लू हाऊस या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. क्रीडा दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री. गणेश सोनटक्के सर, सर्व हाऊस शिक्षक कॅप्टन विद्या करांडे मॅडम, संगिता पारखे मॅडम, योगेश खैरे सर, अतुल पटारे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी खूप परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

