नेवासा – नेवासा पोलिसांनी शहरात छापा टाकून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले प्रतिबंधीत असलेल्या नायलॉन मांजाचे ५ रिळ जप्त करुन गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुमित संजय करंजकर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, १२ जानेवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आयेशा मस्जिद समोर नायकवाडी गल्ली येथे छापा टाकला.
तिथे उमेर मुख्तार शेख (वय २४) याने प्रतिबंधीत असलेल्या नॉयलॉन मांजाच्या विक्रीमुळे पक्षांना, प्राण्यांना व मानवी जिवीतास तीव्र इजा होवुन अपराध घडणे किंवा जिवीत हाणी होवु शकते हे माहिती असताना देखील महाराष्ट्र शासन निर्णय रमाकसी आर. टी २०१५ / प्र.क्र. / ३७ दि. १८ जून २०१६ अन्वये काढलेल्या निर्देशांची अवेदना करुन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडील १२ डिसेंबर २०२५ च्या पत्रानुसार अनाधिकृत रित्या शासनाने बंदी केलेल्या नॉयलॉन .
मांज्याची विक्री करताना मिळून आला आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२५ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम – १९८६ चे कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात जाआला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

