स्मार्ट मीटर

भेंडा – नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावी महावितरण विद्युत कंपनीने स्मार्ट मीटर बसविल्यास फोडण्यात येतील असा इशारा कंपनीस लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिला आहे. स्मार्ट मीटर बसविल्या नंतर खुप ग्राहक वाढीव बील येत असल्याची तक्रार करत आहेत म्हणुन याबाबत माहिती घेतली असता असे समजते की स्मार्ट मीटर मध्ये वीज वापराचे चर टप्पे केलेले आहेत यामध्ये ज्या वेळेत विजेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो त्याच वेळेत वीज वापराच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे.

या बाबत विधानसभा अधिवेशनात मा, आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे की सर्व सामान्य कुटुंबाना त्याच्या परवानगी शिवाय मीटर बसवणार नाही परंतु महावितरण कंपनी ग्राहकांची कुठलीही परवानगी न घेता सदरचे ग्राहकांना वाढीव बील येणारे स्मार्ट मीटर बसवीत आहे.

पूर्वीचे मीटर योग्य असताना स्मार्ट मीटर बसविण्याचा अट्टाहास का ? असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
त्यामुळे स्मार्ट मीटर सौंदाळा गावात बसवू नये अन्यथा सदरचे मीटर फोडण्यात येतील असे मा. अभियंता श्री बडवे आणि उपाभियंता मालुसरे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

स्मार्ट मीटर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्मार्ट मीटर
स्मार्ट मीटर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्मार्ट मीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!