हंडीनिमगाव: सोमवार दि. २६ जानेवारी २०२६, सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक ८:०० वाजता मुख्य अतिथीं एकनाथ भगत साहेब (मारुती ॲग्रो एजन्सीज), संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब अंबाडे साहेब व शाळेचे प्रिन्सिपल पिटर बारगळ सर यांच्या हस्ते भारत मातेची पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्वांनी ‘जन गण मन’ राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली. विद्यार्थ्यांचे संचलन, राष्ट्रगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण रोझलॅन्ड हंडीनिमगाव परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
प्रमुख पाहुणे एकनाथ भगत साहेब यांनी आपल्या भाषणात, संविधानाचे महत्त्व सांगत प्रजासत्ताक दिनाचा अर्थ आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी युवा पिढीवर आणि सर्वांवर कशी ते सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्ये, आणि भाषणे सादर केली, ज्यातून भारतीय संस्कृती आणि बलिदानाचे दर्शन घडले. शाळेच्या एनसीसी (NCC) कॅडेट्सनी आकर्षक संचलन सादर केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शन, स्पोर्ट्स डे, विविध स्पर्धा, निबंध, रांगोळी, गणपती बनविणे आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित एकनाथ भगत साहेब (मारुती ॲग्रो एजन्सीज), भाऊसाहेब अंबाडे साहेब (चेअरमन, रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल), पिटर बारगळ सर (प्रिन्सिपल रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल), बर्वे सर, देवीदास कुटे सर, डायरेक्टर अजित अंबाडे सर, प्रि प्रायमरी इंनचार्ज मनिषा सिन्नरकर, डायरेक्टर निकिता अंबाडे मॅडम उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अस्मि शिंदे व प्रिती करांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार शाळेचे प्रिन्सिपल पिटर बारगळ सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी फार परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गोड वाटून आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

