नेवासाफाटा (वार्ताहर): शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील सांस्कृतिक व क्रीडानगरी, ढोरजळगाव ने येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे मुख्य प्रशासक सचिनराव कर्डिले सर होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय बुधवंत सर तसेच फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य गिऱ्हे सर उपस्थित होते. यावेळी सिनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख संदीप घोडेचोर सर, माध्यमिक विभागाचे प्राचार्य आशिष भारती सर, डी.एड.कॉलेज चे प्राचार्य प्रदीप नवल सर, कनिष्ठ विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम बडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वसतिगृहाचे समन्वय आदिनाथ भोर्डे, स्वामी शेटे, संदीप घोडेचोर, नारायण घोडेचोर, कृष्ण पाडळे, प्रदीप काकडे, गणेश डोळे, शुभम ओंबळे, रवी कोकरे, सोहेल शेख तसेच गिरी मॅडम, निकम मॅडम, डोहाळे मॅडम, काळे मॅडम, बर्डे मॅडम, नेमाने मॅडम, आव्हाड मॅडम आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांबद्दलचा आदर व कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने व प्रामाणिक प्रयत्नांनी यश संपादन करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलनआयशा शेख व कल्याणी डाके यांनी केले, आभार आकाश मिसाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

