आदर्श लॉज

आपला जिल्हा – शहरातीलम आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह व्यवसायाच्या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आदर्श लॉजवर लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५, रा. रंगोली रोड, वॉर्ड क्र. ५) हा महिलांना पैशाचे आमिष दाखऊन देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ बाघचौरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून बनावट ग्राहक व दोन पंचासह लॉजवर सापळा रचण्यात आला. छाप्यात लॉजच्या काऊंटरवर मॅनेजर धीरज बिंगले हा आढळून आला.

आदर्श लॉज

तसेच लॉजमधून तीन पीडित महिला मिळून आल्या. चौकशीत बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. बाबरपुरी, वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर, पसार) हे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत, ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले आहेत.

विशेष म्हणजे, यापुर्वीही दि. १० जानेवारी २०२४ रोजी याच लॉजवर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळीही अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही लॉजच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नसून, आरोपी पुन्हाः पुन्हा महिलांना देहव्यवसायाकडे ढकलत असल्याचे निदर्शनास आले.

सदर आदर्श लॉज हा श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नुराणी मस्जिद यांसारख्या धार्मिक स्थळांच्या अत्यंत जवळ आहे. तसेच परिसरात निवासी वस्ती, शाळा व महाविद्यालये असल्याने नागरिक, विद्यार्थी व भाविकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सामाजिक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

आदर्श लॉज

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम १८ अंतर्गत आदर्श लॉजचा परवाना रद्द करून लॉज बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर यांनी संबंधित लॉजविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, आरोपींनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी आदर्श लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार सदर लॉजमधील कब्जेदारांना सात दिवसांत निष्कासित करून लॉज पोलीस प्रशासनाकडून सीलबंद करण्यात येणार आहे.

आदर्श लॉज

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेढे, दादाभाई मगरे, पो. शि. आजीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकळे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र कातखडे व महिला पोलीस शिपाई मिरा सरग यांनी पार पाडली.

आदर्श लॉज

भविष्यात ज्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे व लॉज हॉटेल चालकांचा सहभाग निष्पन्न होईल, त्या ठिकाणीहीं अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आदर्श लॉज
आदर्श लॉज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आदर्श लॉज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!