किसान संघटन
किसान संघटन

नेवासे – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी देशपातळीवर प्रभावीपणे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय किसान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नरेंद्र पाटील काळे यांची निवड करण्यात आली आहे. ही संघटना जम्मू–काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत कार्यरत असून राष्ट्रीय कार्यकारणी असलेली एकमेव किसान संघटना म्हणून ओळखली जाते.संघटनेच्या या निवडीबद्दल भारतीय किसान श्रमिक जनशक्ती युनियनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी बालाजी त्र्यंबकराव (लातूर) यांनी नरेंद्र पाटील काळे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

किसान संघटन

ही निवड महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही संघटना देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न संघटितपणे मांडत असून, धोरणात्मक पातळीवर निर्णायक लढे उभारत आहे. महाराष्ट्रात संघटना अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकारणी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकरी प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

किसान संघटन

नरेंद्र पाटील काळे हे अनेक सेवाभावी व सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून त्यांना संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. ते सध्या जागतिक माणूस सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,केळी बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य संचालक व प्रसिद्धी प्रमुखया जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत.

किसान संघटन

शेतकऱ्यांचे प्रश्न, अन्याय, कर्ज, बाजारभाव, पाणी, वीज, पीक विमा व धोरणात्मक अडचणी यावर संघटित आवाज उभारण्यासाठी ही संघटना कार्यरत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा असे आवाहन नरेंद्र पाटील काळे यांनी केले आहे.

किसान संघटन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किसान संघटन
किसान संघटन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किसान संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!