रिलस्टार

पाच दिवस पोलीस कोठडी; कोतवाली पोलिसांची कारवाई

आपला जिल्हा- गांजा तस्करीचा आरोप असलेला सर्पमित्र आणि रिलस्टार आकाश मनोहर जाधव (रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची (२ मार्चपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक यांचे पथक व कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून काही महिन्यांपूर्वी केडगाव बायपास शिवारात गांजा तस्करी करणारी टोळी पकडली होती. यात काही संशयितांना अटक करण्यात आली होती. तर काही संशयित पसार झाले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात सर्पमित्र आणि रिलस्टार म्हणून प्रसिध्द असलेला आकाश जाधव याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रिलस्टार

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत असून जाधव याला यापूर्वी परराज्यात गांजा तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्याला कोतवाली पोलीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आता त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे

दरम्यान, त्याला बुधवारी (२५ फेब्रुवारी) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मार्चपर्यंत पोलीस कोठडीत २ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक निरीक्षक सपकाळे अधिक तपास करीत आहेत.

रिलस्टार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रिलस्टार
रिलस्टार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रिलस्टार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!