शनैश्वर देवस्थान
शनैश्वर देवस्थान

सोनई | विजय खंडागळे –अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांच्या वेतन, बोनस विषयी संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बेमुदत उपोषण कालपासून सुरू केले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

शनैश्वर देवस्थान

श्रद्धा आणि व्यवस्थापन यांच्यातील समतोल ढासळल्याचे चित्र या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.कामगार संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर रामदास शिंदे, सेक्रेटरी अजित सोपान शेटे आणि उपाध्यक्ष राजेंद्र सकाहारी शेटे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर करून कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.आश्वासनांचे ढग, निर्णयाचा अभावदि. २२ जानेवारी २०२५ रोजी कार्यकारी समितीने काही निर्णय घेतले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला.

शनैश्वर देवस्थान

दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी काही दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात वेतन, बोनस आणि वेतनफरक यांसारखे मूलभूत प्रश्न आजतागायत प्रलंबितच राहिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.चौकट–प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली असता,मार्च पर्यंत थांबा, म्हटले परंतु संघटनेने ठाम नकार देऊन प्रशासन वेळ काढू पणा घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे*धार्मिक संस्थेच्या व्यवस्थापनाकडून कामगारांशी संवाद साधण्यात सातत्य नसल्याची भावना कर्मचाऱ्यांत वाढत चालली आहे.

शनैश्वर देवस्थान

श्रद्धेच्या आधारावर उभ्या असलेल्या संस्थेत कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.प्रमुख मागण्या कायदिवाळी २०२५ चा दीड पगार इतका बोनस अद्याप देण्यात आलेला नाही, तो तात्काळ अदा करावा अशी मागणी आहे. तसेच सहाय्यक कामगार आयुक्तांसमोर झालेल्या समझोत्याप्रमाणे वेतनबदलातील फरक थकित रकमे सहित देण्यात यावा, अशीही ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.या मागण्या केवळ आर्थिक नसून कर्मचाऱ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेशी निगडित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.आंदोलनात अडथळ्यांचा आरोपउपोषणासाठी मंडप उभारण्याच्या प्रयत्नांनाही अडथळे आणण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

शनैश्वर देवस्थान

मंडपासाठी आलेल्या वाहनाला सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारल्याने साहित्य भिंतीवरून आत न्यावे लागल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे संतापाची भावना अधिक तीव्र झाली असून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांतील दरी वाढल्याचे दिसून येते.पुढे कायदेवस्थानातील दैनंदिन कामकाजावर या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रद्धाळूंची गर्दी, धार्मिक कार्यक्रम आणि व्यवस्थापनाची जबाबदारी या सर्वांमध्ये संतुलन राखणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. कामगार संघटनेने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. श्रद्धास्थानाच्या पवित्र भूमीत उभा राहिलेला हा संघर्ष केवळ वेतनाचा नसून विश्वास, संवाद आणि व्यवस्थापनाच्या उत्तरदायित्वाचा आहे. आता प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा काढणे अत्यावश्यक ठरत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनैश्वर देवस्थान
शनैश्वर देवस्थान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनैश्वर देवस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!