नेवासा – देशाच्या नकाशावर धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या नेवासा नगरीला भाविकांना जोडण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून द्या, मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर आणि जगविख्यात श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरसह देवगड तसेच वरखेड येथील महालक्ष्मी देवस्थानचा कायापालट करण्यासाठी या तीर्थक्षेत्र असलेल्या पुण्यभूमीला जोडण्यासाठी रस्ता कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. लंघे यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली.

नेवासा तालुका हा धार्मिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर असल्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड देवस्थान आणिवरखेड येथील महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. या तीर्थक्षेत्राच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली असून त्यासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.