पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील घोगरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिदेवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, अव्वलगांव, हमरापूर, भामाठाण, कमलपुर या नियोजित गावाच्या परिसरात श्री संत सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह १७८व्या सप्ताहानिमित्ताने घोगरगाव येथील ग्रामस्थांनी एकत्र येत तब्बल ४५ ट्रॅक्टर गावातून श्रमदानासाठी आपले योगदानाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

नियोजित सप्ताहाच्या ठिकाणी या ग्रामस्थांनी आपल्या ४५ ट्रॅक्टरच्या साह्याने जागेवर लेवलींग करत श्रमदानातून घोगरगाव गावाबद्दल एक जिव्हाळा निर्माण केला. त्यात त्या सप्ताहाच्या ठिकाणी प्रति ट्रॅक्टर वीस लिटर डिझेलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व ट्रॅक्टर चालकांना थंड पाणी व नाश्ता देखील सोय उपलब्ध करून दिली.
या परिसरात श्री संत सदगुरु योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या १७८व्या सप्ताहाच्या निमित्ताने पहिलाच सप्ताह असल्याने घोगरगाव ग्रामस्थांनी एकजुटीने गावातील ४५ ट्रॅक्टर देत श्रमदानातून धार्मिक भावना जागृत केल्याने नेवासा तालुक्यातुन या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सप्ताह ठिकाणी सर्व ट्रॅक्टर चालकांचा सन्मान श्रीक्षेत्र गोदावरी धाम यांच्या प्रेरणेने महंत हरीशरण गिरीजी महाराज संदिपान महाराज व योगेंद्र गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.