
नेवासा – अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे कामकाज दिनांक १२/०९/२०२५ रोजी सुरु होत असल्याने सदर महामार्गावर अवजड वाहतुक मोठया प्रमाणात असल्याने वाहतुक कोंडीमुळे नागरीकांची गैरसोय होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीचे कामकाज करणे असल्याने सदर महामर्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
दि. १२/०९/२०२५ रोजी दुपारी १४.०० वा. पासुन ते दि.२१/०९/२०२५ रोजी दुपारी १४.०० वा. पावेतो अहिल्यानगर मनमाड महामार्गावरुन जाणारी व येणारी सर्व प्रकारची आवजड वाहतुक खालील नमुद पर्यायी मार्गाने वळवणे बाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश जारी केले आहत.

१) अहिल्यानगर कडुन, मनमाड, मालेगाव, धुळे कडे जाणारे जड वाहतुकीसाठी मार्ग –
:- विळद सर्कल दुधडेअरी चौक-शेंडी बायपास नेवासा फाटा कायगाव टोके – गंगापुर- वैजापुर मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) अहिल्यानगर कडुन संगमनेर, नाशिक कडे जाणारे अवजड वाहतुकीसाठी मार्ग
:- कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे मार्गे इच्छित स्थळी जातील.
३) कोपरगांव कडून अहिल्यानगर कडे येणारे सर्व अवजड वाहतुकीसाठी मार्ग
:- कोपरगांव- पुणतांबा फाटा वैजापुर मार्गे इच्छित स्थळी जातील. व
(कमी उंचीच्या वाहनांकरीता) कोपरगांव पुणतांबा श्रीरामपुर नेवासाफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

४) सिन्नर लोणी मार्गे अहिल्यानगर कडे येणेकरीता पर्यायी मार्ग संगमनेर आळेफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.