
नेवासा – नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी फत्तेपुर रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांना
नवीन वर्षा निमित्ताने मिष्टान्न भोजन वाटप करून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.हा अभिनव उपक्रम भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल रोठे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.

शरणपूर वृद्धाश्रम प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रंसगी अध्यक्षस्थानी किशोर तुवर व शरणपूर वृद्धाश्रमचे अध्यक्ष रावसाहेब मगर हे होते तर वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब मुटकुळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रावसाहेब मगर यांनी आपल्या दात्यांचे स्वागत करून प्रास्ताविक कले वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करतांना मातापित्यांच्या वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना पुरणपोळीचे मिष्टान्न देऊन भाजपच्या युवा मोर्चाचे रोठे यांनी उपक्रम करून खर्या अर्थाने नवीन वर्षाचा आनंद द्विगुणीत केला असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना रोठे म्हणाले की दान केल्याने पुण्य मिळते हे मला जीवनात अनुभवयास मिळाले,आपण कधी ही हाक द्या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी आम्ही धावून येऊ,संकट प्रसंगी आर्थिक पाठबळ देत राहू अशी ग्वाही देत वृद्धांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी सुजित गोंडे सुजित कापसे एकनाथ सावंत अभिषेक गायकवाड यांच्या सह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

